मागे संतें सांगितले
3392.
मागे संतें सांगितले । ते हे आले फ़ळासी ॥१॥
जावे शरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥
करावे व्रत एकादशी । द्वादशी क्षीरापती सेवन ॥३॥
नेमे जावे पंढरीसी । तेणे चौर्यांयशी चुकती ॥४॥
एका जनार्दनी हेचि सार । वाया भार कासया ॥५॥
