नामस्मरण हरिकीर्तन ।
3393.
नामस्मरण हरिकीर्तन । एकादशीचा व्रत हरिजागरण । द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाही ॥१॥
घडता तिन्ही साधन । कलिमाजीं तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन असंख्य ॥२॥
एका जनार्दनी भाक । पुन्हा जन्म नाही देख । साधन आणिक । दुजे नको करणे ॥३॥
