वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

चांगले नाम गोमटे रूप

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072937 · अभंग क्र. ४०५७

4057.
चांगले नाम गोमटे रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥१॥
शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समयो अवसान । कोठे योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतने ॥धृपद॥
सकळ श्रेष्ठांचे हे मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावे शरणागत । आहे उचित एवढेंचि ॥२॥
म्हणोनि रुसलो संसारा । सर्प हा विखार पांढरा । तुजशी अंतर रे दातारा । याचि दावेदारानिमित्त ॥३॥
येणे मज भोगविल्या खाणी । नसता छंद लाविला मनी । माजलो मी माझे भ्रमणी । जाली बोडणी विटंबना ॥४॥
पावलो केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड । आता केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥

अर्थ :
हरीचे नाम आणि रुप हे चांगले व गोड आहे हरीचे रुप डोळयाने पाहिले की डोळे शांत होतात व सर्व त्रिविधतापाचा नाश होतो. विठ्ठल विठ्ठल हा जप अतिशय प्रगट म्हणजे उघड असून सोपा आणि अतिशय सारभूत आहे. विठ्ठल नाम हे शस्त्र असून हा बाण ज्यावेळी आपला अंत:काळ जवळ येईल त्यावेळी याचा वापर करावा. विठ्ठल नामाच्या पुढे सर्वश्रेष्ठ असलेले गोदान, भूमीदान, सुवर्णदानिक आणि अशा प्रकारचे दहा दान यांची किंमत देखील काय करता येईल, नारायणाचे चिंतन केले असता नारायण दु:खाचे खंडन करतो. सर्वश्रेष्ठ जेष्ठ धा-यांचे हेच मत आहे नारायण आपण केलेल्या संकल्पापर्यंत आपल्याला पोहोचवितो. म्हणून त्याला शरण जावे हेच उचित आहे. म्हणूनच तर मी संसारावर रुसलो आहे संसार हा पांढरा विषारी सर्प आहे. हे दातारा या संसारातील द्रव्यदारांमुळे म्हणजे देहसंबंधी सर्वांमुळेच तुझ्यापासून मी अंतरलो आहे. खरे तर यानेच मला अनेक योनीमध्ये भोग भोगव

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग