धन्य गोकुळ महीतळी मं
341.
धन्य गोकुळ महीतळी मंडन |सुखावले ब्रह्म जाले सगुण ॥१॥
काय न कळे आवडी त्याचा भाव |सुख नेले रे गोंवळी म्हणती देव ॥२॥
आली वैकुंठभुवनी विक्रुति |ते हे पाहावी गौळियांची विश्रांती ॥३॥
योगियांचे ध्यानी उबगले |तया गौळियांचे अनुरागी रंगले ॥४॥
वेद श्रुतीसी पारू न कळे |कोण सुख सर्वांहुनि आगळे ॥५॥
नामयाचा स्वामी आमुचे कुलदैवत |शरण जाऊनि गौळिया मागु उच्छिष्ट ॥६॥
