अमराचे ठेवणे विश्वाच
340.
अमराचे ठेवणे विश्वाचे जीवन |सौभाग्य लावण्य रखुमाईचे ॥१॥
धन्य गौळियांचे जिणे क्रुष्ण बाळपण |यशोदानंदन क्रीडा करी ॥२॥
अंगे स्थूलपणे ब्रह्म खेळा येणे |लीला सामावणे रोमरंध्री ॥३॥
विष्णुदास नामा दैवेचि लहाणे |ज्या घरी खेळणे परब्रह्म ॥४॥
