वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

उठा सकळ जन उठिले नार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079676 · अभंग क्र. ३९९५

3995.
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥धृपद॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनिया ॥२॥
तुका म्हणे काय पढियते ते मागा । आपुलाले सांगा सुख दुःख ॥३॥

अर्थ :
आता सर्वांनी उठून उभे राहा कारण नारायण उठले आहेत व त्यामुळे सर्व मुनीजण आणि तीनही लोक आनंदले आहेत. अपार टाळ, मृदुंग वादयांचा गजर करा व हरीनामाचा जयजयकार करुन हरिच्या नामाचा घोष करा हरीच्या पायावर आपले शीर ठेवून आपले दोन्ही कर जोडून हरीचे मुख सादरपणे पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला काय हवे असेल ते सर्व देवाला मागा आणि तुमचे सर्व सुख, दु:ख देवाला सांगा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग