वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

झाली पाकसिद्धि वाट प

🙏 3. संत तुकाराम · ABH-079547 · अभंग क्र. ३९९४

3994.
झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापले डेरा चीकसा मर्दु द्या पाई ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी । उभ्या आंचवणा गोपीका कळस घेउनी ॥धृपद॥
अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारू मुळा ॥२॥
सावरीली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा ॥३॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळ जना ॥४॥

अर्थ :
देवा स्वयंपाक तयार झाला आहे रखुमाई वाट पाहात आहे हंडाभर पाणी तापले आहे तरी तुमच्या पायाला सुगंधी पदार्थ चोळू दयावे. हे पाडूरंगा उठा तुम्हाला भोजन करण्यास उशीर झाला आहे तुम्हाला आचमन घालण्यासाठी गोपीका कलश घेऊन उभ्या आहेत. देवा तुमच्या सेवेसाठी सर्वजण अगदी सावधान चित्त ठेवून तयार आहेत आणि उध्दव व अक्रूर हे तुम्हाला पाचारण करण्यासाठी आले आहेत. देवा तुमच्या सेजेवर विविध प्रकारची सुगंधी फुले टाकून तुमची सेज सजवण्यात आली आहे तुमच्या शयनगृहामध्ये विविध प्रकारचे रत्नदीप लावण्यात आले आहे व तुमच्या मनोरंजनासाठी ताटामध्ये वाळा व विविध प्रकारचे सुगंधी विडे ठेवण्यात आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरीरायाला माझ्याकडे पाहा अशी विनंती करत आहे आणि इकडे सर्व लोकांना पंढरीरायाची सेवा करण्यासाठी सावध राहा असे देखील सांगत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग