एक ते एक एकासी कळेना
1856.
एक ते एक एकासी कळेना । उगेचि कल्पना घेतीं वेडे ॥१॥
एकवांचुनी नाही एक सर्वा ठायी । एकचि हृदयी पुरें बापा ॥२॥
एकातें आवडी धरिता प्रेमे पोटी । दुजा ठाव सृष्टी कोठे असे ॥३॥
एका जनार्दनी एकाची आवडी । एकपणे गोडी एक जाणे ॥४॥