वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

हृद्विकसित पद्मी तू

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076145 · अभंग क्र. २९

29.
हृद्विकसित पद्मी तू विलससि सर्वेशा ।
रविशशि लोपति तेजे अज तू अमरेशा ।
अचळा अमळा अरुपा अगुणा गगनेशा ।
तुजविण महिमा नेणेचि परेशा ॥१॥
जयदेव जयदेव जय अंतरसाक्षी ।
दीपवत् विश्वी वर्तासि जिवशिव दो पक्षी॥ध्रु०॥
षड्विध चक्रे शोधुनि रोधुनिया चित्ता ।
बोधुनि कर्णी त्यागुनि शरिराची ममता ।
नवही नादा अनुभवी अनुभव त्यापरता ।
भेदुनि काकीमुख जै देही ये समता ॥२॥जय०॥
अकार उकार मकार निमती ते तुर्या ।
बिंदुस्थानी उन्मनी अनुभवि जे चर्या ।
अक्षरही साक्षर तू उत्तम गुणवर्या ।
बहेणि म्हणता वाणी न धरी मम धैर्या ॥३॥जय०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग