सद्गुरुचे पाय धरीन ह
30.
सद्गुरुचे पाय धरीन हृदयात ।
राहीन ध्यानस्थ सर्वकाळ ॥१॥
मग तुझे मना काय तेथे उरे ।
ध्यानाचे वाघुरे सापडसी ॥२॥
सद्गुरुवचनी धरीन विश्वास ।
प्रेम अविनाश होय तेथे ॥३॥
श्रीगुरुचा सर्व होईन मी दास ।
सर्वस्वे उदास होउनीया ॥४॥
देह वाचा मन समर्पीन पायी ।
सद्गुरु हृदयी साठवीन ॥५॥
बहेणि म्हणे मना सांडी रे मीपण ।
होय तू शरण सद्गुरुशी ॥६॥
