प्रेमी गोपींचा व श्र
154.
प्रेमी गोपींचा व श्रुती रुपी गोपींचा भेटी समय संवाद
मागोनिया गोपी आल्या तिजपासी । कोठे ह्लषि-केशी सांग आम्हा ॥१॥
टाकोनिया गेला मज पूतनारी । येथेंचि मुरारी गुप्त झाला ॥२॥
वैकुंठनायका अगा नारायणा । दावींरे वदना एक वेळा ॥३॥
कृष्णाचे चरित्र सकळ करिती । मन रंजविती नामा म्हणे ॥४॥
