ऐसे आनंदाने एक मास र
7.
ऐसे आनंदाने एक मास राहिला । परी हेत गुंतला पांडुरंगी ॥१॥
रात्रंदिवस छंद विठ्ठल नामाचा । नाही संसाराचा हेत मनी ॥२॥
भोजन सारूनी बैसले एकांती । निर्मळा बोलती चोखियासी ॥३॥
बहु दिस झाले खंती वाटे मना । पंढरीचा राणा आठवत ॥४॥
गोडधड जिवासी ते कांही । कई हो डोई पायी ठेवीन मी ॥५॥
निर्मळा म्हणे अहो देवरायाभेटी लवलाह्या देई मज ॥६॥
