देवासी तुष्टण्या एक
885.
देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखी सदा ॥१॥
काया वाचा मने संतासींशरण । तेणे नारायण तुष्ट होय ॥२॥
नामापरतें साधन आणीक नाही दुजे । एका जनार्दनी निज नाम सार ॥३॥