लावुनी आसन बैससी समा
884.
लावुनी आसन बैससी समाधी । तो तो उपाधी सहज लागे ॥१॥
नाममुखीं गातीं जोडे सायुज्यता । उपाधि तत्त्वता दूरी पळे ॥२॥
घडती कोटी यज्ञयागांचें ते फळ । मुखी रामनाम सबळ असो ॥३॥
एका जनार्दनी जयी ऐसा नेम । तोचि पुरुषोत्तम जनामाजीं ॥४॥
