शिवरात्री कथा धन्य ज
59.
शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिले पावती सर्व कांही ॥१॥
पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखी विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काल करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही । जपावी सज्जनी वारंवार ॥४॥
