वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

नामाचा महिमा कोण जाण

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072987 · अभंग क्र. ६०

60.
नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मानेणे कांही ॥१॥
संसारा आलिया हेचि आहे जोडी । अखंड घ्यावी गोडी हरिनामे ॥२॥
सहस्त्रमुखे शेष वाखाणिता कीर्ती । नाही तया तृप्ति आजीवरी ॥३॥
पशु पक्षी तृण कीटक अपार । नामे गेले पार उतरोनि ॥४॥
कापुराचे राशी पडे अग्निकण । तैसे नाम जाण पातकासी ॥५॥
नामाग्नीने दोष जळती एकसरा । कैवल्य जे धरा बसल्या ठायी ॥६॥
नामा म्हने धन्य नामाचा प्रताप । ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग