अंतरींचा विस्तारू ब्
657.
अंतरींचा विस्तारू ब्रह्मी पाल्हायिला ।
तेथे एक मनु सिद्धसाधक भला ॥१॥
तेणे केले अनारिसे केले अनारिसे ।
पाहो गेले सरिसे हरपले गे माये ॥२॥
तेथे ऋग् यजुःसाम भुलले ।
ते माझ्या ठायी फुलले ब्रह्ममय ॥३॥
रखुमादेविवर अंतरब्रह्मी तरंगु जाला ।
ब्रह्मउदधी सामावला मज घेऊनि माये ॥४॥
अर्थ :
अंतरीचा परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विस्तार पाहु गेले असता तेथे तो परमात्माच मनाच्या उपाधि भेदाने सिद्ध साधक नटलेला आहे. अशा सिद्ध स्थितित पावलेल्या मनाने मला देहादि अनात्म धर्मापासून वेगळे केले. नंतर मी पाहू लागले तो माझे मीपणच हरपले म्हणजे मला परमात्मस्वरूप प्राप्त झाले. त्या परमात्मस्वरूपाचा विचार करण्यांत ऋग्यजुःसाम हे वेद भुलुन गेले. ज्या परमात्मस्वरूपाविषयी ते भुलून गेले ते परमात्मस्वरूपच माझ्याच ठिकाणी सर्व ब्रम्हमय आहे. ऱखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे ब्रह्मरूपी समुद्रावर एक तरंग असल्यामुळे त्या समुद्रात ऐक्य पावला. असे माऊली सांगतात.
