गर्भवासा भीती ते अंध
1736.
गर्भवासा भीती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाही आम्हा ॥१॥
गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ॥२॥
आम्ही सुखे गर्भवास घेऊ देखा । मुक्तिचिया मस्तकां पाय देऊ ॥३॥
एका जनार्दनी गर्भवास सोसुं । संतांचा सोरसु हाती लागे ॥४॥
