बालका देखोनि संकटीं
1737.
बालका देखोनि संकटीं । माता कार्य टाकुनि उठी ॥१॥
ऐसे दयेचे ठायी जाण । आपुलें जाणावे पारिखेपण ॥२॥
महापुरी बुडे तयाते । उडीं घाली कृपाळु तेथे ॥३॥
दीनाचिये लाभी । जो निघे जळतीये अंगी ॥४॥
ऐसे दयेचे पाळी लळे । एका जनार्दनी चरणी लोले ॥५॥
