वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

एक एकादशी जरी होय पं

🙏 24. संत बंका · ABH-075646 · अभंग क्र. ७

7.
एक एकादशी जरी होय पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्म नेणे ॥१॥
चंद्रभागे तीरी चतुर्भुज नरनारी । तेथे उभा हरी पंढरीराव ॥२॥
परतोनि मागुता ऐसा कई होसी । जाउनी पंढरीसी पाहे डोळा ॥३॥
तुझे देह गेह ऐसे पै न म्हण । साधी हे निधान पांडुरंग ॥४॥
पुनरपि संसार न येसी मागुता । आणिक सर्वथा ऐसा नाही ॥५॥
बंका म्हणे पहाल भजाल देही । तापत्रय गेले सर्वही पांडुरंगी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग