वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नामे तो सरता नामे तो

🙏 4. संत नामदेव · ABH-083384 · अभंग क्र. ६४९

649.
नामे तो सरता नामे तो परता | नामे पंढरीनाथा भेटविले ॥१॥
नाम हेचि तारी नाम भवसागरी | उतरी पैलतिरी नाम तुझे ॥२॥
नाम ते अंजन नामे बोधे मन | नामेचि निधान चांगला जाला ॥३॥
मार्गी जाता तुम्ही उगेचि नसावे | वाचेसि म्हणावे रामकृष्ण ॥४॥
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी | केशव नरहरी नारायण ॥५॥
ऐसा हा सतत आठव नामाचा | नामा म्हणे कैंचा दोष तया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग