चिंतातुर देही न साहे
650.
चिंतातुर देही न साहे काजळी | नामाची पाजळी उभय दिवी ॥१॥
प्रकाश पडेल ब्रह्म हे दिसेल | वैकुंठ जोडेल भजनभक्ती ॥२॥
नाही याती वर्ण नाही हे वेदोक्त | नामेचि संतृप्ति होती जीवा ॥३॥
नामा म्हणे नाम हेचि बीजसार | तुटेल येरझार भवबंधाची ॥४॥
