समुद्राचे पाणी मुंगी
2122.
समुद्राचे पाणी मुंगी मुखांतुनी | काढाया लागोनि श्रम थोडे ॥१॥
केशवाची भक्ति कठीण त्याहूनि | वाया दंभपणी नोहे नोहे ॥२॥
आकाश अंगुळे माप सुयेमान | भूमीचे वजन पालडेनि ॥३॥
तामा म्हणे वारा वळू ये कदापि | केशवाचे रूपी नव्हे बुद्धि ॥४॥
