भरते त्यागिली जननी ।
497.
भरते त्यागिली जननी । ख्याति झाली त्रिभुवनी ॥१॥
ऐसी भक्ति तुझी हरी । जनी करंटा न करी ॥२॥
बंधु अवज्ञा बिभिषणा । प्रगट झाला रामराणा ॥३॥
प्रर्हाद पितृआज्ञा न करी । स्तंभी प्रगटला नरहरी ॥४॥
पति अवज्ञा ऋषिपत्न्यांसी । कृष्ण दर्शन पूर्ण त्यांसी ॥५॥
नाना ह्मणे भक्ता अवरोधी पाही । त्यासी त्यजिल्या दोष नाही ॥६॥
