पंढरिचा देव बहुत कों
498.
पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा ॥१॥
सारथि सर्वांच्या साक्षिभूत असे । संकटी सायासे गजेंद्रासी ॥२॥
गजें-द्रासी रक्षी गणिका उद्धरी । भिल्लीणीचे करी फळे भक्षी ॥३॥
भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी । नामा ह्मणे हरि गोड मानी ॥४॥
