वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(डाकाचे रूपक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079540 · अभंग क्र. ३९१६

3916.
(डाकाचे रूपक)
अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरितांचि भाव । कोठे नाहीसे झाले ॥१॥
दिसे सारिखे सारिखे । परि ते कारणी पारिखे । तळी गेले देखे । वरी टोले न साहाती ॥धृपद॥
पट एका शिरी । यथाविधीने त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगी ॥२॥
तुका म्हणे माना । येथे कोणी रुसावे ना । आपुलाल्या स्थाना । जेथे त्याचि शोभल्या ॥३॥

अर्थ :
सर्व देवता श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत तर मग पूजा करण्यासाठी योग्य ठिकाण व देव कोणता आहे ? एका देवाच्या ठिकाणी भक्तिभाव धरला तर दुस-या देवाच्या ठिकाणी भक्तिभाव नाहीसा होतो. दिसायला जरी सर्व देव सारखेसारखे असले तरी आपआपल्या गुणामुळे ते वेगवेगळे आहेत. जसे घराचे बांधकाम करत असताना तळाला म्हणजे पायामध्ये गेलेले दगड यांना कोणत्याही प्रकारचे घाव बसलेले नसतात. परंतु बांधकाम करत असताना वरती आलेल्या दगडांना टाकीचे घाव सोसावे लागतात म्हणजे सर्व दगड सारखे आहेत परंतु ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार वेगवेगळे प्रकार होतात. माणसे हे सर्वत्र सारखे आहेत परंतु ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्यांच्यामधे अंतर आहे म्हणजे एकाच्या डोक्यावर मुकुट असतात तर बाकीचे सर्व सामान्य असतात. माती हा एकच प्रकार आहे परंतु त्या मातीपासून वेगवेगळे मडकी, घागरे, रांजण, डेरे, लक्ष्मी तयार होत असते काही ठिकाणी मडक्यांचा उपयोग भाद्रपदामध्ये महालक्ष्मी म्हणून केला जातो तशी बाकीची नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे या क्षेत्रामध्ये मान घेण्यासाठी कोणीही रुसून बसू नये. आपआपल्या स्थानावरच जे ते देव देवी शोभून दिसत असतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग