तीन अक्षरे निवृत्ति
7.
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी अहोरात्री ।
तया सायुज्यता मुक्त्ती । ब्रम्हास्थिति सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव ।
तया ब्रम्हापदी ठाव । ऐसे शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान ही तीन अक्षरे । जो जप करी निर्धारे ।
तयास ब्रम्ह साक्षात्कारे । होय सत्त्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा ।
तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऐसी ही चौदा अक्षरे । जो ऐके कर्ण विवरे ।
की उच्चारी मुखद्वारे । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनी प्रेम । जो जप करील धरील नेम ।
तयास पुन :नाही जन्म । ऐसे पुरुषोत्तम बोलिले ॥६॥
