आत्माज्ञानपर
१६.
आत्माज्ञानपर
सांडि सांडि रे गोवळ्या नाना मते ॥
जेधे मी माजी हारपे ॥ लक्ष ते ॥१॥
आष्टधा प्रकृति तेणे जाया रे ॥
कर्ण छेदुनि भगवि मुद्रा वाया रे ॥२॥
सेवी सद्गुरु चर लवलाह्यारे ॥
तेणे सर्वहि अभ्यंतर पडे ठाया रे ॥३॥
येक म्हणति राखोना दाद भेद ।
जया नाहि आत्मज्ञान मुढ आंध ॥४॥
ये धरुनिया वेश मति मंद ॥
मंत्र दैवत संकल्प भव छेउ ॥५॥
सांडि भ्रांति उभ्रांति दत्तमानसि ।
करि चिंतन येकाग्र आहिर्णीसि ॥६॥
सेख महमद बोले स्वरूपेसि ॥
जगी अवतार घेतला मल वोसि ॥७॥
चौयासि भ्रमत जालो कासाविस ॥८॥
१७.
संताचा मारग लौकीकावेगळा ।
ते लाधली कळा सेख महमदा ॥१॥
सविल वधिति गाई । म्हैसि हाले ।
येणे ते छेडिले काम क्रोध कल्पना ॥छ ।
सविल करिति सोपाटा साठिं ।
येणे केल्या कोटि । महापुण्याच्या ॥२॥
सविल करिति विस्वासघात ।
याचि वरि नेत । परउपकारि ॥३॥
सविल ते खाति मद्य मांस सरा ।
जाति येमपुरा येमाच्या जाचे ॥४॥
सिदि भांग भुर्का सेविति सविल ।
यारूचे आमोल निज नामाचा ॥५॥
सविल करिति सेत कुळवाडी ।
हा वाचे आवडी ॥ निरावलंब ॥६॥
सविला लागाल गुरु गोडिचा छंद ।
याचे वाचे हरिकथेचा ॥७॥
सविला आवडे लुडकि पोस्त ।
याला नित्य नित्य वीटेल चर्चा ॥८॥
सविला आवडे कुटाळि हा ।
भजे गोविंदा अहिर्निस ॥९॥
सेख महमद भाविका प्रबोधा ।
अभाविका छउ अविद्येचा ॥१०॥
सविला आवडे धनधान्य संवति ।
याला सदा प्रीति साधुसंताची ॥११॥
सविल विछीती गाई म्हसियासी ।
विधी मुक्तीयासि कस दासि जाल्या ॥१२॥
सविले कष्टति तीर्थे व्रते सद्गुरुकृपे ।
सोपे वैकुंठ यासि ॥१३॥
सविला आवडे लोकासि भांडणे ।
यांच्या घेतलि मने । तत्वकवि ॥१४॥
सविला आवडे अबोला धरणे ।
हा निवंतपणे निशब्दि बोध ॥१५॥
सविला आवडे चोरि मारि पाप ।
याला भाउभय परावाचेचि ॥१६॥
लोकाला (सविला) आवडे वहाड करणे ॥
सायोग्यता येणे धरीयेली ॥१७॥
योगींद्र इच्छिति नानाविध कर्म ।
यालागी परब्रह्म आंगे सदा ॥१८॥
अज्ञानाचि तपे ॥ अभिमानचि जे ।
द्वैत तेचि काजे ॥ शुभाशुभ ॥१९॥
त्रिगुण कल्पीत संविलांचे चित्त ।
ममत्वे विरक्त सेख महमद ॥२०॥
सविला आविडति पालख्या घोडे ।
छत्र्या क्षमा दया बर्या आवडे शांति ॥२१॥
सविल मांडति भुरासिला ॥
निजपउ याला मिरासि जाली ॥२२॥
भाटानि वर्णिल्या मुढां ॥
याला वर्णीत खरे । च्याही देव ॥२३॥
सविला मायबाप दोन्ही आवडति ।
याला भावभक्ति माये बाप ॥२४॥
विषये अबळासि सविलांचे नेत्र ।
याचे ते पाव ( ?) पाहति संता ॥२५॥
सविलचि कान कुटाळि ऐकति ।
याचे चित्त देति कीर्तनासि ॥२६॥
सविल करि नाना सोंग तोरा ।
याचा वेष बरा येक वर्ष ॥२७॥
येकाचे अनेक होति केल्याबरि ।
म्हणउनि त्याला सरि प्रळयाचि ॥२८॥
अष्टधा प्रकृति विहावी जोडिलेव ।
हरिहर ब्रह्मादिका । हा लववेना ॥२९॥
सेख महमद या नांव ठाकले ।
भक्तिला धरिले भाविकांचे ॥३०॥
चौसि लक्ष नावे । येके येके देही ।
उपनावा नाही गणीत अभक्ता ॥३१॥
सविल पीडले यानि नावे ऐसे ।
हायाति नामी असे ॥ आनाम आकुळि ॥३२॥
सविला आवडे मी तु पण भूषण ।
कल्पनेविण मन आमन याचे ॥३३॥
आपलाल्या मते सविल फुंदति ।
सविल हासति रूपदर्शन न्याये ॥३४॥
सविला चटि हास्य विलास ।
वोजा जाणे खुणा जा ब्रह्मज्ञानि ॥३५॥
केकतिच्या झाडा कांटीयांचि ।
प्रबळता त्यात निवजता सुगंध केवडा ॥३६॥
तेवि अनेक दृष्टि । साधु निवजति ।
त्याचे गुण न धरिति नष्ट दुष्ट काटे ॥३७॥
सविल तोडिति साधु संतांचे मन ।
याने समाधान भलत्याचे केले ॥३८॥
नष्टा दष्टा जाये मोलेंविण वाया ।
काटे करिति नास शरिराचा ॥३९॥
सेख महमद नष्टा दंष्टां बोधी ।
धरितिल संधी भाविक भोळे ॥४०॥
सविल पाहाति दोनि डोळियांनी ।
हा आनंत लोचनिं अनेक पाहे ॥४१॥
सविल विछिति लेहिले कागद हा ।
वाचि नंद कागद कोरे ॥४२॥
सविल भजति षमिक बुथिले ।
हा भजे परमार्थाने नाहिं वाम बुद्धि ॥४३॥
सविल पुरविति सोयेऱ्यांच्या कोड ।
याला बहु वेड साधुसंतांचे ॥४४॥
सविल एक देसि पुजिति देवता ।
हा पुजि भगता ॥ अनिवार ॥४५॥
सविल वार करि येता आता पीडिति ।
देव घेव करिति । पाप पुन्याचे ॥४६॥
सविल सोसिति गर्भ येमपुरि ॥
जाया गमन थोरि । जाळिली याने ॥४७॥
गरुड टके चिडीया सविलां पताका ।
दिंडीया तरुवर ऐक मताका यास ॥४८॥
तिवाल्या जमखाने सविला आवडति ।
यानि महिमा स्थिति । तिवासि थोरी ॥४९॥
सविलाचि तीर्थे पाण्याने वाहाति ।
या विवेक शांति सत्रावि वेणी ॥५०॥
दगडाचे देउळे आवडति जना ।
याचे मना आणा ब्रह्मांड देउळे ॥५१॥
सविला आवति मंडत रखत ।
याला थोर शोभत मंडप नभः ॥५२॥
प्रतिमा देऊळे सविला आवडति ।
याचा देव सति । अखंड न खंडे ॥५३॥
सविला आवडति कांसिवाच्या घांटा ।
याचा गर्ज मोटा अनुहाते ॥५४॥
निकट निज जा सेख महमदाचि ।
मानली संता त्याचि प्रेमाने तत्वभळविता ॥५५॥
१८.
हुदंई वंदखान जत सत कवाडे ।
कोंडिला केवाडे । अव्यक्त व्यक्तिने ॥१॥
सद्गुरु मन तुष्टमान जाले ।
मग ते दोन्ही आले । वीक वैराग्य छ ।
भाव माझा घोडा भक्ति मा विळ ।
तस्कर गोपाळ । पचिके केले ॥२॥
वो चा हात खोडा विज्ञानाची खिटि ।
परमा बळकटि । गोविंदा केलि ॥३॥
निजवृत्तिच्या बेड्या प्रेमाचे चामोटे ।
पिछोंडे गोमटे स्यात्तिने वांधले ॥४॥
धर्म दया विरक्ति गळा तो रब ।
साजे आकलिना बोजे । हरित्वाने ॥५॥
हा झोड कळला पुंडलिका राया ।
वेळी लगवया टाकिलि विट ॥६॥
मागे मक्त सळिल हे श्रवण जाले ।
हरिकारा ग्रहि दिल्हे सेख महमदि ॥७॥
भक्ति लालुचि पा णाचा जाला ।
हाटे उभा आठविस युगे ॥८॥
भावाचा लोलिप्त अव्यक्त क्ति ।
येतो जड देह धरितो प्रतिमेचे ॥९॥
ऐकत उभा द्वारि भाव भक्ति आसे ।
निर्धार त्या ऐसे आणीक ये नाहि ॥१०॥
भोळि देखोनि सिंपिया नाग्याने ।
वाटि दुध त्याचि प्रीति सेवि ॥११॥
नर नरि ऐसी जना दिसे थोडी ।
याचा न कळे ? पथर कोण्हा ॥१२॥
याचेच उचिष्ट महार सेवि त्या सवे ।
नित जेवि पांडुरंग ॥१३॥
सुभासुभ नेणे विस्वाचा जनिता ।
सांपडिला सेखमहमदिं ॥१४॥
अभंग गाथा समाप्त
