विरहावस्था - अभंग ११
119.
विरहावस्था - अभंग ११९ ते १३८
आजी वो का हो कृष्ण नाही आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा ।
काय हो ऐसा देही लागला चाळा । का रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥
कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं ।
कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥
हा कृष्ण आजी का घरी नये । आता काय करु यासी उपाय ।
एका जनार्दनी धरु जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचे ॥३॥
