गुरू गुरू अवघे जाले
339.
गुरू गुरू अवघे जाले ।
उपदेश मांडिले ।
सद्गुरूकृपेचा न कळे ।
महिमा कोण ॥१॥
नानापरीचे ज्ञानध्यान ।
सांगती जपतप अनुष्ठान ।
परि ते सद्गुरू-लक्षण ।
अगम्य जाणा ॥२॥
अगमनिगमधार ।
एक ते जारणाधिकारी ।
चुकोनिया जाले वैरी ।
देवाचे कैसे ॥३॥
नाना मंत्र उपासना ।
सांग यंत्रधारणा ।
परी ते सद्गुरूचरणा ।
न पावती कोन्ही ॥४॥
बहेणि म्हणे आता वाया ।
जन्म का करावा जाया ।
भजावे श्रीगुरूच्या पाया ।
सर्वहि सिद्धि रे ॥५॥
