वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गुरू ते जाणावे समुद्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076312 · अभंग क्र. ३४०

340.
गुरू ते जाणावे समुद्रासारिखे ।
कदाकाळी देखे नुचंबळती ॥१॥
ऐसे ते जाणावे सद्गुरू वेव्हारे ।
कल्पांती न सरे निजधन ॥२॥
संत जे जाणावे धैर्यमेरूपरी ।
पडता नभ वरी ढळती ना ॥३॥
संत ते जाणावे वैराग्य विरक्ति ।
तिळ ते ज्ञानघन ॥४॥
संत ते जाणावे पूर्ण वेदमूर्ती ।
कर्मब्रह्मस्थिति ठसावली ॥५॥
संत ते जाणावे वैराग्य विरक्ति ।
तिळ ते आसक्ति विषयी नाही ॥६॥
संत ते जाणावे उदासीन वृत्ति ।
द्वंद्वातीत मूर्ति लीनरूपी ॥७॥
संत ते जाणावे क्षमेचे सागर ।
दयेचे आगर शांतिवेषे ॥८॥
भूतकृपा वसे ब्रह्म सर्व अस ।
संत ते मानसे वोळखाव ॥९॥
तीर्थ यात्रा देव करिती उत्छाव ।
तेचि संत राव कलीमाजी ॥१०॥
आहारी वेव्हारी इंद्रियांचे द्वारे ।
युक्त जे निर्धारी तेचि संत ॥११॥
बहेणि म्हणे ऐसी गुरूची पारखी ।
शोधूनिया सुखी होय शिष्य ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग