न बोलसी बोल फुकाचा त
487.
न बोलसी बोल फुकाचा तू एक ।
पहासी कवतुक काय डोळा ॥१॥
जाईन मी आता घालूनिया धुळी ।
कासयासी कळी वाढविसी ॥२॥
नाही तरी म्हण आपुलिया तोंडे ।
किती तुजपुढे बोल बोलू ॥३॥
बहेणि म्हणे चाल करू चौघाचार ।
बैसोनी वेव्हार निवडिती ते ॥४॥
