मागता मागता ज्ञानदेव
486.
मागता मागता ज्ञानदेव क्लेश ।
पावला बावीस जन्म जाले ॥१॥
परी तुझे मन ‘ देईन’ न म्हणे ।
बहुता बळे तेणे उगवले ॥२॥
चौदा शते जाली बंदी चांगदेवा ।
तेव्हा त्वा केशवा फेडी केली ॥३॥
बहेणि म्हणे माझे जन्म गेले तेरा ।
परी फजितखोरा न देसी तू ॥४॥
