उपास कराडी । तिही कर
3410.
उपास कराडी । तिही करावी बापुडी ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारीली आस ॥धृपद॥
भक्तीच्या उत्कर्षे । नाही मुक्तीचे ते पिसे ॥२॥
तुका म्हणे बळ । अंगी आमुच्या सकळ ॥३॥
अर्थ :
जे भोळे भाबडे लोक आहेत त्यांनीच उपासतापास करावेत. आम्ही तर विठोबाचे दास आहोत सर्व चिंता, आशा, अपेक्षा आम्ही झुगारुन दिले आहेत. आम्हाला भक्तीचा उत्कर्ष आहे आवड आहे मुक्तीचे वेड नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या अंगामध्ये सर्व प्रकारचे बळ आहे.
