ऐसे असता तो सरूम आला
23.
ऐसे असता तो सरूम आला काळ । प्रारब्धाचे बळ कैसे पाहा ॥१॥
हिंडता हिंडता फार कष्टि झाला । दृष्टिस तयाला न पडे कांही ॥२॥
कडे दरी मोठया पर्वताचे वरी । रिघोनिया करी नाना युक्ती ॥३॥
झाली सांजवेळ न मिळे आमीष । होऊनि उदास राहिलासे ॥४॥
नाना ह्मणे मग काय त्याने केले । ऐकावे निश्चळे साधूजनी ॥५॥
