ऐकतांचि शब्द होऊनि क
22.
ऐकतांचि शब्द होऊनि किरात । राहिला निवांत एके ग्रामी ॥१॥
पाळणपोषण विषयांची वोढी । करीतसे जोडी पात-काची ॥२॥
चण्ड भिल्लनाम घेतले ठेऊनि । दुष्टभाव मनी वाढ-विला ॥३॥
कासेसी वाधुरा हाती शूळ दंड । सामोग्री उदंड मेळविली ॥४॥
हिंदे नान वन पर्वत शिखरे । मारीतसे फार जीवजंतू ॥५॥
जातीचा स्वभाव लागला तयासी । कष्टे अहर्निशी ह्मणे नामा ॥६॥
