वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

निट पाठ आम्हा धीट हा

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090124 · अभंग क्र. ३८

38.
निट पाठ आम्हा धीट हा प्रबंध । जन वन बोध ब्रह्मरसे ॥१॥
ते मेघःशाममूर्ति स्वरुप गोजिरी । गोकुळींची चोरी करी कृष्ण ॥२॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ । अखंड अचळ स्वरुप ज्यांचे ॥३॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण । गयनीची खुण आगम रुपे ॥४॥

अर्थ:
सर्व जगता मध्ये तो परमात्मा एक रसाने व्यापला आहे तो परमात्मा आपला विस्तार प्रबंधात्मक रुपाने बोध करुन देत आहे.तोच परमात्मा ढगाच्या रंगाचे सावळे सगुण रुप घेऊन गोकुळात चोरी करतो. असे सतत नित्य, अखंड, अचळ, अढळ असे स्वरुप काळा जसा शु्द रंग म्हणजे दुसरा रंग मिसळा तरी सावळेपण न सोडणारा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथा मुळे पुर्ण स्वरुप असलेले वेदाना आगम्य असलेले परमात्म स्वरुप मला समजले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग