वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

जहाला इंद्र शेष तरी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074450 · अभंग क्र. ५१७

517.
जहाला इंद्र शेष तरी आम्हा काय ।
नैश्वरी तो पाहे भुललासे ॥१॥
हरिश्चंद्रादिक ब्रह्मादि करून ।
मायोपाधीन भास जाले ॥२॥
निरंजनी घेता ययाचि पै शुद्धि ।
एकही अवधी न दिसती ॥३॥
हरिहरादिक देही सुकल्पिक ।
इतरांचा लेख कोण करी ॥४॥
गुरूकृपायोगे ब्रह्म ज्ञानेश्वर ।
तरला संसार भवसिंध ॥

अर्थ :
इंद्राला स्वर्णाचे व शेषाला पाताळाचे राज्यभोग असले तरी आम्हाला त्याचे काय कौतुक ते क्षणभंगुर सुखातच गुरफटलेले आहेत. हरिश्चंद्र, ब्रह्मदेव वगैरे यक्ति देखील मायोपाधीने भासमात्र झालेले आहेत. शुद्ध ब्रह्माच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्वच नाही. मोठ मोठे विष्णु शंकरादिक हेही जर काल्पनिकच आहेत तर इतरांची काय कथा. सद्गुरू कृपेने मी बह्मरूप आहे अशी खात्री होऊन या संसार सिंधुतून तरून गेलो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग