वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

चौदा विद्या जरी पूर्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074483 · अभंग क्र. ५१८

518.
चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेविण ॥१॥
तीन वीस चारी कळा अनुभविले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥२॥
अष्टांगादि योग प्रयासे जोडले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥३॥
कर्मधर्मक्रिया नाना आचरले ।
व्यर्थची जाहले ज्ञानेवीण ॥४॥
ज्ञानेश्वर म्हणे ब्रह्म साधियले ।
कीर आथीयले ज्ञानेवीण ॥५॥

अर्थ :
चौदा विद्या, चौसष्ट कला, अष्टांग योग व अनेक पुण्यकारक कर्माचरणे केली पण ब्रह्मज्ञान जर झाले नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. एका ब्रह्मज्ञानावांचून काही जरी केले तरी ते सर्व व्यर्थ होय असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग