वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

साभिमाने करुनी व्यर्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074403 · अभंग क्र. ५१६

516.
साभिमाने करुनी व्यर्थ कारे फुगशी ।
मत्त ऐसा होसी मतिमंदा ॥१॥
सर्वब्रह्मरुप हे खूण ओळखी ।
भिन्नपण टाकी निश्चयेंसी ॥२॥
मान अपमान तुज काही नाही ।
तू तव विदेहीनित्य शुध्द ॥३॥
प्रारब्धाने देह भोगिता हे भोग ।
कासया रे सांग भ्रांती तुज ॥४॥
साधोनी अपरोक्ष वस्तु सर्वगत ।
ज्ञानेश्वर म्हणत राजयोंगी ॥५॥

अर्थ :
हे मंदमति पुरुष तू कर्तृत्व भोर्तृत्वाने उन्मत्त होऊन अहंकाराने व्यर्थ का फुगतोस त्या ऐवजी सर्व जगत ब्रह्मरुप आहे असा अव्दैत भाव प्राप्त करुन व्दैत भाव टाकून दे. मान अपमान धर्म देहाचे आहेत हा धर्म तुझा नाही तू त्या देहाहून भिन्न ब्रह्मरुप आहेस. प्रारब्धाने भोग भोगीत असताना तुला आपलेपणाचा भ्रम कशाला. सर्व व्यापकत्वाने ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान ज्याला झाले तोच राजयोगी होय असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग