(व्यभिचारिणी स्त्रीच
3430.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
आम्हा आम्ही आता वडील धाकुटी । नाही पाठी पोटी कोणी दुजे ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हासवे सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायी । असो जेथे नाही दुजे कोणी ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)आता आम्हीच आमचे वडील व आम्हीच आमचे धाकटे आहोत आमच्या पाठीमागेही कोणी नाही व पुढेही दुसरे कोणी नाही. हरी हा आम्हाला एकातात बसल्यानंतर भेटतो व आम्ही त्याचा भोग घेतो हरीच्या ठिकाणीच आमचा एकविध भक्तीभाव आहे व हरी देखील आमचा सर्वस्वाने भोग घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, एकातामध्ये जाऊन आम्ही हरीशी अंगसंग करतो हरीचा आम्ही व आमचा हरी असे आम्ही दोघेही अद्वैत स्वरुपाने एकमेकाचा भोग घेतो.
