वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080493 · अभंग क्र. ३४३१

3431.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ । तोडियेले जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥२॥
तुका म्हणे आता गर्भ नये धरू । औषध जे करू फळ नव्हे ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)आम्ही सर्व प्रकारचे सुख सर्वकाळ भोगू कारण आम्ही सर्व प्रकारचे जाळे व मोहपाश तोडून टाकले आहेत. यासाठीच आम्ही प्रपंचरुपी संसाररुपी आमचा नवरा आम्ही सोडून दिला आहे व परपुरुष असा हरी याच्याशी आम्ही रत झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही पुन्हा संसाररुपी नवऱ्याकडे जाऊन जन्ममरणरुपी येरझार गर्भधारणा करुन घेणार नाही त्यापेक्षा आम्ही ज्ञानरुपी औषध सेवन करु असे केल्याने आम्हाला जन्ममरणरुपी बाळ होणारच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग