वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

दिसे सगुण परि निर्गु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085201 · अभंग क्र. १००

100.
दिसे सगुण परि निर्गुण । आगमा निगमां न कळे महिमान ।
परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥
पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।
गौळणी गार्‍हाणी सांगती नानापरी॥त्यांचे महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥
कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।
दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांही ॥३॥
चोरी करिता बांधितीं उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडाव ।
एका जनार्दनी दावी सोंग बरवे । ज्यांची कीर्ति ऐकता अघ नासे सर्वे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग