लिंगपुरानी हा बोलिला
61.
लिंगपुरानी हा बोलिला इतिहास । तोचि म्या तुम्हांस निवेदिला ॥१॥
अनेक पुराणी अनेक प्रकार । ताराक्या नर नारी लोक ॥२॥
मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा । कैलासी चा राणी तोष पावे ॥३॥
नामा म्हणे मन करोनि निश्चळ । करा गदारोळ नामघोष ॥४॥
