रोडगा ३९२० ते ३९२१
3920.
रोडगा ३९२० ते ३९२१
सत्वर पाव गे मला । भवानी आईरोडगा वाहीन तुला ॥१॥ सासरा माझा गांवी गेलातिकडेच खपवी त्याला ॥२॥सासु माझी जाचकरती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥ जाऊ माझीफडफड बोलती । बोडकी करगंतिला॥४नणंदेचेपोर किरकिर करितें । खरुज होऊ देत्याला ॥५॥ दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ।॥६॥एका जनार्दनी सगळेचि जाऊ दे । एकटिच । राहु दे मला॥७॥
