अयोध्येचा हो देव्हार
3921.
अयोध्येचा हो देव्हारा । आलाअहंकाराचा वारा । डोळे फीरवीं गरगरा ॥१॥ मानवीरामाबाई मानवी कृष्णाबाई ॥धृ.॥ रामाबाईचाघरचारु । चौघाजणांचा व्यापारु । सहा अठराचापडीभारु ॥२॥ रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटीनेविणीला । तुजलागीं पांघुरविला ॥३॥ तेथोनिजालासे सोहळा । रामाबाईंला ओवाळा । एकाजनार्दनीं मुळा ॥४॥
