अर्ध क्षण घडता संतां
1748.
अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणे होय शांती महत्पापा ॥१॥
संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाही घालु नको ॥२॥
संसार मज न करणे सर्वथा । परमार्थ पुरता हाती देई ॥३॥
जनार्दनाचा एका करुणावचनी । करी विनवणी पायांपाशी ॥४॥