ज्यासी नाही संतसंग ।
1747.
ज्यासी नाही संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥
तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥
अखंड नाम वाचे कीर्ति । संतसंग विश्रांती मज देई ॥३॥
मागणें ते द्यावे । आणिक मागणें जीवी नाही ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ सोपा उपाय ॥५॥
