सोईरे धाईरे आम्ही सं
1749.
सोईरे धाईरे आम्ही संतजन । तयाविण चिंतन आन नाही ॥१॥
हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाही ॥२॥
हेंचि माझे कर्म हाचि माझा धर्म । वाउगाचि श्रम न करी दुजा ॥३॥
हेंचि माझे ज्ञान हेंचि माझे विज्ञान । संताविन शरण न जाय कोणा ॥४॥
एका जनार्दनी हा माझा निश्चय । वंदिन मी पाय सर्वभावे ॥५॥
