वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

निर्गुणाचे हाती व्यव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074300 · अभंग क्र. ६५८

658.
निर्गुणाचे हाती व्यवहारू पडिला ।
दाईजपणा मुकला साभिलाषे ॥१॥
निरंजन वनी धरीन मुरारी ।
भाग अभ्यंतरी घेईन देखा ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु सोवळा ।
भागा मज आला हरिहरू ॥३॥

अर्थ :
निर्गुण परमात्मस्वरूपाच्या हाती सर्व जगत व्यवहार अध्यस्त असल्यामुळे जीवाचे आणि त्याचे एकपणाचे नाते मूळचेच आहे. परंत देहादिकांशी तादात्म्य पावल्यामुळे दीनपणा आला आहे. वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो त्याचा दाईज म्हणजे त्यापैकीच आहे. त्या परमात्मस्वरूपाचा अभिलाष धरल्यामुळे त्याच्या प्राप्तीने आप्तेष्टपणाचा तो पृथक संबंध गेला. असा निरंजन वनांत सगुणरूपाने वास करणारा जो मुरारी त्याला धरून त्याचा भाग मनांत आणील. माझे पिता व रखुमादेवीचे पती, जो हरिहरात्मक सोवळा श्रीविठ्ठल तो माझ्या भागाला आला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग